राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 96.28 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई/Mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 8 हजार 950 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 8 हजार 172 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 74 हजार 594 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.28टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,52,60,468 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,05,190 (13.71 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,77,615 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,156 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 1,00,429 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com