राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

रिकव्हरी रेट 96.27 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई / Mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 13 हजार 452जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 7 हजार 761 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 167 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 26 हजार 727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 61 लाख 97 हजार 018 इतकी झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 65 हजार 644 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.27 टक्के इतके झाले आहे.

राज्यात सध्या 1 लाख 1 हजार 337 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com