राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

रिकव्हरी रेट 96.05 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई / Mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 8 हजार 899 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 9 हजार 558 नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 174 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचा मृत्यूदर 2.02 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 167 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.05 टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,31,24,800 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,22,893 (14.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,34,423 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,645 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,14,625 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com