राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 96 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई / Mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 8 हजार 395 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 9 हजार 489 नवे करोना (coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 153 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2 .01 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 58 लाख 45 हजार 315 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96 टक्के इतके झाले आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 58,45,315 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,17,575 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण
अनिल देशमुखांंना ईडीचे तिसरे समन्स
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com