राज्यात आज 10 हजाराहून अधिक नवे करोना रुग्ण

बरे होण्याचं प्रमाण 73 टक्क्यांवर
राज्यात आज 10 हजाराहून अधिक नवे करोना रुग्ण

मुंबई | mumbai -

महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज राज्यात 10 हजार 425 नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. coronavirus patient in maharashtra

राज्यात आज 10425 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 12300 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 514790 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 165921 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 73.14% झाले आहे.

एकीकडे राज्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत असली तरीही रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. मंगळवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजेच 12 हजार 300 रुग्ण बरे झाले आहेत. आज 329 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com