राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 95.9 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 9 हजार 43 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 8 हजार 470 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 188 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख 42 हजार 258 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.9 टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या 1 लाख 23 हजार 340 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,98,86,554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,87,521 (15.01टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,58,863 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com