राज्यात 14 हजार 161 नवे करोना रुग्ण, 339 मृत्यू
महाराष्ट्र

राज्यात 14 हजार 161 नवे करोना रुग्ण, 339 मृत्यू

आतापर्यंत 21 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai -

राज्यात 14 हजार 161 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 339 मृत्यूंची नोंद झाली आहे. coronavirus patient in maharashtra

दरम्यान मागील 24 तासांत 11 हजार 749 रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 4 लाख 70 हजार 873 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 1 लाख 64 हजार 562 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे 21 हजार 698 रुग्णांचा महाराष्ट्रात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही मााहिती दिली आहे.

आतापर्यंत देण्यात आलेल्या 34 लाख 92 हजार 966 नमुन्यांपैकी 6 लाख 57 हजार 450 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 11 लाख 92 हजार 685 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 35 हजार 132 लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com