दिलासा : राज्यात आज ‘इतके’ करोना करोनामुक्त!

दिलासा : राज्यात आज ‘इतके’ करोना करोनामुक्त!

मुंबई - आज राज्यात आज 15 हजार 77 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 33 हजार रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, 184 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 53,95,370 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 93.88 टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.66 टक्के इतका आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,50,55,054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,46,892 (16.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18,70,304 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 10,743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 2,53,367 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com