राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - राज्यात आज 18 हजार 600 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर उपचारानंतर बरे झालेल्या 22 हजार 532 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 53 लाख 62 हजार 370 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.55 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यात एकूण 2 लाख 71 हजार 801 सक्रीय रुग्ण आहेत. आज करोनामुळे 402 जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.65 टक्के इतका आहे. आतापर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या 3 कोटी 48 लाख 61 हजार 608 नमुन्यांपैकी 57 लाख 31 हजार 815 जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील करोना पॉझिटिव्हीटी दर 16.44 टक्के इतका आहे.

Related Stories

No stories found.