राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 92.76 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - आज राज्यात 24 हजार 752 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 23 हजार 65 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 52,41,833 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 92.76 टक्के इतके झाले आहे. आज 453 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के इतका आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,38,24,959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,50,907 (16.71 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23,70,326 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 3,15,042 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com