राज्यात आज 14 हजार 492 नवे करोना रुग्ण

आज 12 हजार 243 रुग्णांची करोनावर मात
राज्यात आज 14 हजार 492 नवे करोना रुग्ण

मुंबई |Mumbai -

महाराष्ट्रात आज उच्चांकी 14 हजार 492 नवे रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. तर आज दिवसभरात 326 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. coronavirus patient in maharashtra

राज्यातील करोनाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या 6 लाख 43 हजार 289 इतकी झाली आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत सध्या 1 लाख 62 हजार 491 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

एकीकडे राज्यातील रुग्णांचा आलेख वाढत असताना एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज तब्बल 12 हजार 243 रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. तर, राज्यात आत्तापर्यंत 4 लाख 59 हजार 124 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 71.37 टक्के इतका झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट वाढत असल्यानं किंचित दिलासा मिळत आहे. राज्यात सध्या 11 लाख 76 हजार 261 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर, 36 हजार 639 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांत 326 करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या 21 हजार 359 इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर 3.32 टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात आतापर्यंत 34 लाख 14 हजार 809 चाचण्यांपैकी 6 लाख 43 हजार 289 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com