राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - आज राज्यात 24 हजार 136 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 92.76 टक्के इतका झाला आहे.राज्यात आतापर्यंत एकूण 56 लाख 26 हजार 155 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

त्यापैकी सध्या 3 लाख 14 हजार 368 रुग्ण सध्या अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात राज्यातील 36 हजार 176 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 52 लाख 18 हजार 768 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

दरम्यान, एकीकडे करोना बाधिकांचा आकडा निम्म्यावर आलेला असताना करोनामुळे होणार्‍या मृतांचा आकडा मात्र सातत्याने जास्तच राहिला आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात करोनामुळे 601 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 90 हजार 349 इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com