राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

29 हजार 177 रुग्ण करोनामुक्त

मुंबई - राज्यात आज 26 हजार 672 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 29 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 51 लाख 40 हजार 272 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 92.12% इतके झाले आहे. तर आज 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59% इतका आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,30,13,516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26,96,306 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात सध्या एकूण 3,48,395 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. नोंद झालेल्या एकूण 594 मृत्यूंपैकी 398 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 196 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com