राज्यात आज ‘इतके’ रूग्ण करोनामुक्त

आज 26 हजार 133 नवे रूग्ण
राज्यात आज ‘इतके’ रूग्ण करोनामुक्त

मुंबई - राज्यात आज 40 हजार 294 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत तर 26 हजार 133 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आज 682 करोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 51,11,095 करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 92.04 टक्के इतके झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57 टक्के इतका आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,27,23,361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,53,225 (16.97 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,55,729 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 3,52,247 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com