राज्यात आज ‘इतके’ रूग्ण करोनामुक्त

29 हजार 644 नवे रूग्ण
राज्यात आज ‘इतके’ रूग्ण करोनामुक्त

नवी दिल्ली - राज्यात आज 44 हजार 493 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत तर 29 हजार 644 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 50,70,801 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 91.74 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 555 रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत 86 हजार 618 रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% इतका आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,24,41,776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,27,092 (17.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात एकूण 3,67,121 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com