राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

47 हजार 371 रूग्ण करोनामुक्त
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई - राज्यात आज 29 हजार 911 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 47 हजार 371 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. आज राज्यात 738 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 50,26,308 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतली आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 91.43 टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आतापर्यंत 85 हजार 355 रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55 टक्के इतका आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,21,54,275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,97,448 (17.09 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29,35,409 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 3,83,253 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com