राज्यात आज ‘इतके’ रूग्ण करोनामुक्त

रिकव्हरी रेट 89.74 टक्के
राज्यात आज ‘इतके’ रूग्ण करोनामुक्त

मुंबई - राज्यात आज 59 हजार 318 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत तर 34 हजार 389 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 974 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 48,26,371 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 89.74 टक्के इतके झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत 81 हजार 486 रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के इतका आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,11,03,991 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53,78,452 (17.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,91,981 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,398 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 4,68,109 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com