राज्यात 13 हजार 165 नवे करोना रुग्ण, 346 मृत्यू
महाराष्ट्र

राज्यात 13 हजार 165 नवे करोना रुग्ण, 346 मृत्यू

आतापर्यंत 4 लाख 46 हजार 881 रुग्णांना डिस्चार्ज

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai -

राज्यात 13 हजार 165 नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 9 हजार 11 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. coronavirus patient in maharashtra

आतापर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही 6 लाख 28 हजार 642 इतकी झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 881 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 71. 9 टक्के झाला आहे. तर मागील 24 तासांमध्ये 346 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृत्यू दर 3.35 टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात 11 लाख 62 हजार 450 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 37 हजार 94 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या 33 लाख 37 हजार 848 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 6 लाख 28 हजार 642 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 1 लाख 60 हजार 413 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com