दिलासा : राज्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के
दिलासा : राज्यात आज ‘इतक्या’ जणांना डिस्चार्ज

मुंबई -

महाराष्ट्रात आज उपचारानंतर बरे झालेल्या 58 हजार 805 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 46 लाख 196 इतकी झाली आहे. तर राज्यातले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01 टक्क्यांवर पोहोचले आहे.

आज राज्यात 46 हजार 781 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या आता 5 लाख 48 हजार 129 वर पोहोचली आहे. आज राज्यात 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com