राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

रिकव्हरी रेट 82.19 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई - महाराष्ट्रात आज 66 हजार 191 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या 42 लाख 95 हजार 27 इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत 64 हजार 760 जणांच्या मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के इतका झाला आहे.

आज दिवसभरात 61 हजार 450 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 82.19 इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 57 लाख 49 हजार 543 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 42 लाख 95 हजार 27 (16.68) टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42 लाख 36 हजार 825 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29 हजार 966 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात 6 लाख 98 हजार 354 रुग्ण सक्रीय आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com