राज्यात आज करोना बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

राज्यात आज करोना बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

66 हजार 836 नवे करोनाबाधित

मुंबई -

राज्यात आज आढळून आलेल्या करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या ही अधिक आहे. उपचारानंतर बरे झालेल्या 74 हजार 45 जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर 66 हजार 836 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. 773 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 34,04,792 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.81 टक्के इतके झाले आहे. तर, आतापर्यंत राज्यात करोनामुळे 63 हजार 252 रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52% इतका आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,51,73,596 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 41,61,676 (16.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,88,266 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,378 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 6,91,851 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com