मुंबई -

महाराष्ट्रात आज उच्चांकी तब्बल 56 हजार 286 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 376 रूग्णांचा

मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.77 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत 57 हजार 28 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात एकूण 5,21,317 क्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज 36 हजार 130 रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 26,49,757 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 82.05 टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,13,85,551 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 32,29,547 (15.10 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,02,613 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,661 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.