राज्यात 11 हजार 119 नवे करोना रुग्ण, 422 मृत्यू
महाराष्ट्र

राज्यात 11 हजार 119 नवे करोना रुग्ण, 422 मृत्यू

मागील 24 तासांमध्ये 9 हजार 356 रुग्णांना डिस्चार्ज

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

राज्यात आज 11 हजार 119 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर 422 मृत्यूंची नोंद झाली आहे. 9 हजार 356 रुग्णांना मागील 24 तासांमध्ये डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता 6 लाख 15 हजार 477 इतकी झाली आहे. आतापर्यंत 20 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 4 लाख 37 हजार 870 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर महाराष्ट्रात 1 लाख 56 हजार 608 हे रुग्ण महाराष्ट्रात सध्या अ‍ॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. coronavirus patient in maharashtra

राज्यात 422 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 3.36 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32 लाख 64 हजार 384 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 6 लाख 15 हजार 477 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11 लाख 35 हजार 749 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 38 हजार 175 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 56 हजार 608 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com