राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

बरे होण्याचं प्रमाण 81.13 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

महाराष्ट्राचं करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं आजचं प्रमाण हे 81.13 टक्के असून आज 15,575 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर

13,395 नवे रुग्ण आज आढळून आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

राज्यात आजवर 11,96,441 रुग्ण बरे झाले असून या सर्वांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात सध्या 2,41,986 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज 15,575 रुग्ण बरे झाल्याने रुग्ण बरे होण्याचं आजचं प्रमाणं 81.13 टक्के झालं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com