राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

16,715 करोनामुक्त
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई -

राज्यात सलग तिसर्‍या दिवशी करोना बाधितांपेक्षा करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात

मागच्या 24 तासात 14 हजार 578 जणांना करोना व्हायरसची लागण झाली. आज 355 रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. आज दिवसभरात करोनामुक्त झालेल्या 16,715 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात आतापर्यंत एकूण 14 लाख 80 हजार 489 जणांना करोनाची लागण झाली आहे. यात 39 हजार 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 11 लाख 96 हजरा 441 जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात अजूनही 2 लाख 44 हजार 527 अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. कालही करोनाबाधितांपेक्षा महाराष्ट्रात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. मंगळवारी राज्यात एकूण 12 हजार 958 नवे करोना रुग्ण आढळले तर 17 हजार 141 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com