राज्यात सलग तिसर्‍या दिवशी करोनामुक्त झालेल्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक

रिकव्हरी रेट 78.61 वर
राज्यात सलग तिसर्‍या दिवशी करोनामुक्त झालेल्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक

मुंबई -

देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप वाढत असला तरी देखील, करोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे. राज्यात आज सलग तिसर्‍या दिवशी

दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यभरात आज 18 हजार 317 नवे करोनाबाधित आढळले, तर 19 हजार 163 जणांनी करोनावर मात केली आहे. याचबरोबर आज 481 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 78.61 वर पोहचला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 13 लाख 84 हजार 446 वर पोहचली आहे. ज्यामध्ये 2 लाख 59 हजार 33 अ‍ॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले 10 लाख 88 हजार 322 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 36 हजार 662 जणांच्या संख्येचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com