राज्यात आज ‘इतके’ नवे करोनाबाधित

रिकव्हरी रेट 72.51 टक्क्यांवर
राज्यात आज ‘इतके’ नवे करोनाबाधित

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात

19 हजार 218 नवे करोनाबाधित आढळले. तर, 378 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 8 लाख 63 हजार 62 वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले 6 लाख 25 हजार 773 जण, 2 लाख 10 हजार 978 अ‍ॅक्टिव्ह केसेस आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 25 हजार 964 जणांच्या संख्येचा समावेश आहे.

आज दिवसभरात राज्यभरात 13 हजार 289 जणांना डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत राज्यात 6 लाख 25 हजार 773 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 72.51 टक्क्यांवर पोहचला आहे.

आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासण्या करण्यात आलेल्या एकूण 44 लाख 66 हजार 249 नमून्यांपैकी, 8 लाख 63 हजार 62 नमूने (19.32 टक्के) करोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 14 लाख 51 हजार 343 जण गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) आहेत. तर, 36 हजार 873 जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन)मध्ये आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com