राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

रिकव्हरी रेट 96.34 टक्के

मुंबई / Mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 7 हजार 756 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 7 हजार 302 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात आज 120 करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 16 हजार 506 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.34 टक्के इतके झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के इतका झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 62 लाख 64 हजार 59 जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 62 लाख 45 हजार 57 जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे प्रमाण 13.5 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 94 हजार 168 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 5 लाख 51 हजार 872 जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 3 हजार 743 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com