राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

रिकव्हरी रेट 96.33 टक्के
राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

मुंबई / mumbai - राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 7 हजार 510 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 6 हजार 910 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

तसेच 147 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 911 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.33 टक्के इतके झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,58,46,165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,29,596 (13.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,60,354 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज सध्या एकूण 94,593 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com