महाराष्ट्रात आज ‘इतके’ करोनाबाधित
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज ‘इतके’ करोनाबाधित

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 72.69 टक्क्यांवर

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सध्या हे प्रमाण 72.69 टक्के झाले आहे.

तर दिवसभरात 14,888 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 7,637 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. coronavirus patient in maharashtra

आतापर्यंत एकूण 5,22,427 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 1,72,873 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72,69 टक्के झाले आहे.

दरम्यान, मुंबईला मागे सारून देशातील करोना हॉटस्पॉटचं नवं केंद्र बनलेल्या पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1617 रुग्ण आढळल्याने, एकूण रुग्णसंख्या 87 हजार 317 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 2 हजार 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1369 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर 70 हजार 269 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com