महाराष्ट्रात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणार्‍यांची संख्या जास्त
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणार्‍यांची संख्या जास्त

13 हजार 408 रुग्णांना डिस्चार्ज

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणार्‍यांती संख्या जास्त असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल 13 हजार 408 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे करोनामुक्त होणार्‍यांची एकूण संख्या आता 3 लाख 81 हजार 843 इतकी झाली आहे. coronavirus in maharashtra

बुधवारी राज्यात 12 हजार 712 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 313 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 513 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहे.

तर दुसरीकडे राज्यात चोवीस तासांमध्ये 344 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 18 हजार 650 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो आता 69.64 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com