पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

321 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 321 रुग्ण आढळल्याने 1 लाख 59 हजार 77 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 4 हजार 86 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणारे 730 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 47 हजार 642 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 183 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 205 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 86 हजार 464 वर पोहचली असून पैकी 82 हजार 715 जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 286 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com