पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

नव्याने आढळले 1,978 रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे | Pune -

पुण्यात आज नव्याने 1978 रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,19,657 एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात

45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 2 हजार 793 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या 1,587 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 99 हजार 076 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,622 वर पोहोचली आहे. यामध्ये समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत 50,041 जणांनी करोनावर मात केली आहे. आज शहरात 1,038 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,682 रुग्ण आज करोनातून मुक्त झाले आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 6,616 एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com