पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

418 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 418 करोना रुग्ण आढळल्याने 1 लाख 57 हजार 51 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 हजार 964 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणारे 860 रुग्ण बरे झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. 1 लाख 43 हजार 229 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 228 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 355 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 85 हजार 323 वर पोहचली असून पैकी 81 हजार 107 जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 2,010 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com