पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

528 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 528 रुग्ण आढळल्याने 1 लाख 55 हजार 595 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणारे 1413 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 40 हजार 863 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 313 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 468 जण आज करोनातून मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 84 हजार 564 वर पोहचली असून पैकी 79 हजार 746 जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 376 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com