पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

969 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 969 रुग्ण आढळल्याने 1 लाख 51 हजार 402 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज

दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1060 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 33 हजार 600 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 661 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 664 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 81 हजार 942 वर पोहचली असून पैकी 76 हजार 50 जण हे करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 826 येवढी आहे अशी महिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com