पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

643 नवे रुग्ण
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे -

पुण्यात आज दिवसभरात 643 नवे करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या

1 लाख 50 हजार 433 एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजअखेर 3 हजार 709 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या 1270 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 32 हजार 540 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 533 करोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 23 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तसेच आज 882 जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 81 हजार 372 वर पोहचली असून यांपैकी 75 हजार 386 जण करोनातून बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 57 एवढी असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com