करोना : राज्यात 31 जुलैपर्यंत  निर्बंध कायम
महाराष्ट्र

करोना : राज्यात 31 जुलैपर्यंत निर्बंध कायम

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना अधिकार

Dhananjay Shinde

मुंबई - करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून मिशन बिगिन अगेनच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे 30 जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत. दरम्यान

राज्यसरकारने एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com