
मुंबई -
राज्य सरकारी कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात करोनावरील उपचारासाठी खर्च झालेली रक्कम
सरकार परत करणार आहे. 2 सप्टेंबर 2020 पासून हा आदेश लागू होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
टोपे यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे, शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मित तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणार्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते. हा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-19 या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.