पुण्यात उद्यापासून लॉकडाऊन
महाराष्ट्र

पुण्यात उद्यापासून लॉकडाऊन

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचा निर्णय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पुणे (प्रतिनिधी) - उद्यापासून (मंगळवार) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यावेळी लॉकडाऊन पूर्वीपेक्षा जास्त कडकपणे राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान नागरिकांनी फळे, भाजीपाला, किराणा आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात सोमवारी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र होते. लॉकडाऊनच्या काळात फक्त दुध आणि औषध वगळता अन्य सर्व दुकाने बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी शहरातील बाजारात गर्दी केलीय. पुण्याच्या गुलटेकडी येथील फळबाजारात आज सकाळपासूनच नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. भाजीपाला आणि फळ विकत घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेत आले होते. अचानक गर्दी वाढल्याने या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांवर ताण पडला. गर्दी वाढल्याने कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

दरम्यान, कडक लॉकडाऊन असल्याने भाज्यांच्या आणि फळांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने फळभाज्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप निर्माण झालाय. आधीच तीन महिन्यांपासून काम धंदा नाही आणि अशा परिस्थितीत इतक्या महाग पालेभाज्या आम्ही कशा खरेदी करायचा असा प्रश्नही ग्राहकांकडून विचारण्यात येत होता.

Deshdoot
www.deshdoot.com