अहमद पटेल करोना पॉझिटिव्ह

ट्विटवर दिली माहिती
अहमद पटेल करोना पॉझिटिव्ह

मुंबई -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी एका ट्विट करत

ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला वेगळे करावे, असं आवाहन पटेल यांनी केले आहे.

राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे, तपासणीत मला करोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी स्वत: ला वेगळे करावे, असं आवाहन मी करतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com