राज्यात आज 9 हजार 181 नवे करोना रुग्ण, 293 मृत्यू

6 हजार 11 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात आज 9 हजार 181 नवे करोना रुग्ण, 293 मृत्यू

मुंबई | Mumbai -

राज्यात आज 9 हजार 181 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 293 रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 6 हजार 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही 5 लाख 24 हजार 513 इतकी झाली आहे. ज्यापैकी 1 लाख 47 हजार 735 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर करोनाची लागण होऊन आतापर्यंत 18 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 3 लाख 58 हजार 421 रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. coronavirus in maharashtra

मागील 24 तासात 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 3 लाख 58 हजार 421 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 68.33 टक्के झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 9 हजार 181 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात मागील 24 तासात 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा 3.44 टक्के झाला आहे. आजपर्य्त तपासण्यात आलेल्या 27 लाख 73 हजार 520 रुग्णांच्या नमुन्यांपैकी 5 लाख 24 हजार 513 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 1 हजार 268 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर 35 हजार 521 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com