पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

2 हजार 93 नवे करोनाबाधित
पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे | Pune -

पुण्यात आज दिवसभरात 2 हजार 93 नवे करोनाबाधित आढळल्याने, एकूण रुग्ण संख्या 1 लाख 5 हजार 905 वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात

44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 2 हजार 512 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1 हजार 569 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 86 हजार 940 रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात 1 हजार 41 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, 913 जणांना आज डिस्चार्ज मिळाला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 55 हजार 234 वर पोहचली आहे. त्यापैकी, 43 हजार 982 जण करोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 226 असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com