मुंबई -

महाराष्ट्रात करोना प्रतिबंधक लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स  समोर आले नाहीत असा दावा राजेश टोपे आरोग्यमंत्री राजेश टोपे

यांनी केला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत सव्वा पाच लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लस सुरक्षित असून सर्वांनी घ्यावी असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

तसेच लसीकरण झाले म्हणून आता आपण मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आणि सॅनिटाझेशन न करणे हे करायचे नाही, असे अजिबात नाही, असेही ते म्हणाले.

काल (सोमवारी) केंद्र सरकारची टीम राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आली होती. त्यावेळी काही जिल्ह्यांमध्ये रेट वाढत असल्याचे समोर आले.

उदाहरणार्थ, अकोला, यवतमाळ, नंदुरबार, अमरावती, रत्नागिरी जिल्ह्यात रेट वाढ आहेत. त्याच दृष्टीकोनातून चर्चा केली गेली. जिथे सीएफआर म्हणजे केस फॅकल्टी रेट, स्टेट एव्हरेजपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्याचा देखील अभ्यास केला.

तर त्यामधून त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या, त्या आमच्या विभागाने मान्य केल्या आहेत आणि आमच्या विभागाने खात्री दिली आहे की, हे आम्ही करू. त्यामध्ये सीएफआर (केस फॅकल्टी रेट) कमी करण्यासाठी वास्तविक हा एव्हरेज रेट जास्त असला तरी विक ऑन विक जो सीएफआर रेट आहे, तो कमी आहे.

पण ओव्हर ऑल जो रेट आहे तो कमी करण्यासाठी, तिथल्या डॉक्टरांना ट्रेडिंग देणे, थ्री टी प्रिन्सिपल तिथे राबवणे म्हणजेच ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीडमेंट या थ्री प्रिन्सिपल कडकपणे राबवणे. नवीन स्ट्रेनचे नमुने पुण्याच्या व्हायरोलॉजी सेंटरला पाठवणे.

जिनोमिक सिक्वेन्स होतय का? याकडे लक्ष द्यायचे आहे. या सगळ्या गोष्टींकडे निरीक्षण ठेवणे, अॅनालिसिस करणे यासंदर्भातली माहिती आरोग्य विभागाने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात निर्देश आणि सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.