विधानभवनात 2500 जणांची करोना चाचणी

17 जण पॉझिटिव्ह
विधानभवनात 2500 जणांची करोना चाचणी

मुंबई -

राज्य सरकारच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला मुंबईत आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर

विधिमंडळातील कर्मचारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधी अशा 2500 जणांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 17 जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पोलिस आणि काही विधानभवन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, मागील पावसाळी अधिवेशनात देखील 52 जणांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्या तुलनेत करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com