राज्यातील आणखी एका मंत्र्याच्या घरात करोनाचा शिरकाव
महाराष्ट्र

राज्यातील आणखी एका मंत्र्याच्या घरात करोनाचा शिरकाव

त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

देशासह राज्यात करोनाचा कहर वाढतच आहे. राज्यातील अनेक आमदार , मंत्री हे देखील बाधीत झाले आहे. त्यातच

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात देखील करोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. विश्वजीत कदम यांचा पुतण्या, भाऊ व वहिनीचा यात समावेश आहे त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.

त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे, "माझा पुतण्या डॉ. जितेश कदम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू एच. एम. कदम आणि वहिनी यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करीत डॉ. जितेश हे पलूस-कडेगावसह सांगली-मिरज भागांमध्ये अहोरात्र सेवाकार्य करीत होते. क्वारेन्टाईन

भागांमधील नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपासून सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटप अशा अनेक आघाड्यांवर ते सर्वसामान्य जनतेला मदत करीत होते. त्यांची तब्येत ठीक असून मी स्वतः उपचारांवर जातीने लक्ष देत आहे. डॉ. जितेश हे लढवय्ये असून कोरोना संसर्गावर मात करून ते पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत होतील, असा मला विश्वास आहे."

माझा पुतण्या डॉ. जितेश कदम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू एच. एम. कदम आणि वहिनी यांचाही...

Posted by Vishwajeet Kadam on Monday, August 10, 2020
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com