आर्यन खानबाबत NCB च्या चौकशी समितीने केला धक्कादायक खुलासा

आर्यन खानबाबत NCB च्या चौकशी समितीने केला धक्कादायक खुलासा

मुंबई | Mumbai

काही महिन्यांपूर्वी राजकीय वादळ उठवणारे कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी (Cordelia Cruise Drugs Party) प्रकरण, यात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात झाली होती.

एनसीबी (NCB) कडून करण्यात आलेल्या कारवाई संशयास्पद वाटल्यानंतर या प्रकरणाचा तपास तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (Special Investigation Team) नेमण्यात आलं. या नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) एका धक्कादायक अहलवाल दिला आहे.

आर्यन खानबाबत NCB च्या चौकशी समितीने केला धक्कादायक खुलासा
...असा पार पडला लग्नसोहळा शिबानी-फरहानचा लग्नसोहळा; पाहा खास फोटो

NCB ने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असंही तपासात समोर आलं आहे. त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आर्यन खानबाबत NCB च्या चौकशी समितीने केला धक्कादायक खुलासा
मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

काय आहे प्रकरण?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना NCB नं ३ ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.

नवाब मलिक यांचा दावा खरा ठरला?

दरम्यान कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत NCB वर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आर्यन खान याला अडकवण्यात आलं असून हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच या प्रकरणात मोहित भारतीय हा मास्टरमाईंड असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला होता. त्यामुळे नवाब मलिक यांनी केलेला दावा खरा असल्याचं आता बोललं जात आहे.

आर्यन खानबाबत NCB च्या चौकशी समितीने केला धक्कादायक खुलासा
आज Facebook चा वाढदिवस : फेसबुकबद्दल 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com