राज्यातल्या २९ व्या महापालिकेची राज्य सरकारकडून घोषणा

जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर
राज्यातल्या २९ व्या महापालिकेची राज्य सरकारकडून घोषणा

मुंबई | Mumbai

औद्योगिक, सर्वात मोठी स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मोठी बाजार पेठ असलेल्या (Jalna News) जालना शहरातील नगर परिषदेचे रुपांतर महापालिकेत (Jalna Municipality) करण्यात आले आहे. या संदर्भातील घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नगर विकास उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. नगरपालिकेची महानगरपालिका करताना तुर्तास हद्दवाढ न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु होती. दोन तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील २९ वी महापालिका ठरली आहे.

राज्यातल्या २९ व्या महापालिकेची राज्य सरकारकडून घोषणा
Accident : प्रवाशांसह बस पैनगंगा नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर १७ जण जखमी

मराठवाड्यात जालना जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. स्टील इंडस्ट्रीमुळे बांधकामासाठी लागणारं स्टील जालना जिल्ह्यातून राज्यभरातच नव्हे तर देशातील अनेक भागात पाठवलं जातं. त्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक उलाढाल पाहायला मिळते.

राज्यातल्या २९ व्या महापालिकेची राज्य सरकारकडून घोषणा
Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा डान्स सुरू झाला अन् पत्र्याचं शेड कोसळलं, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

याशिवाय कृषीच्या दृष्टीने देखील जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. महाराष्ट्रातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्यातील मोसंबी विक्रीसाठी पाठवले जातात. राजकीयदृष्ट्या देखील जालन्याची कायम चर्चा होत असते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा अशीही याची ओळख आहे.

राज्यातल्या २९ व्या महापालिकेची राज्य सरकारकडून घोषणा
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात, कोणाला मिळणार सत्तेचा मुकूट?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com