बियाणे, खते पुरवठ्याच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष

बियाणे, खते पुरवठ्याच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष
युरिया खत

मुंबई |प्रतिनिधी

करोना रोखण्यासाठी असलेल्या निर्बंधकाळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून कृषी आयुक्तालयस्तरवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे.

त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८४४६११७५०० तसेच कृषी विभागचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधून तक्रार किंवा अडचण मांडता येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com