मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुंबई लगतच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पुन्हा सुरू करण्यास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. शिवस्मारकाच्या बांधकामासंदर्भातील त्रुटी दूर करून सर्वोच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध उठविण्यासाठी सरकार बाजू मांडेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना शिवस्मारकाच्या कामाविषयी माहिती दिली.

ते म्हणाले, स्मारक प्रकरणी काही स्वयंसेवी संस्था न्यायालयात गेल्या आहेत. स्मारकाचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जानेवारी 2019 च्या आदेशान्वये बंद आहे. पण, त्यातील त्रुटी दूर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्या दूर केल्यावर स्मारकाच्या कामास प्रारंभ होईल आणि ते लवकरच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवस्मारकाविषयी

नरिमन पाँइंट येथून दिड किमी समुद्रात शिवस्मारक प्रस्तावित

प्रकल्पासाठी इजिज इंडिया सल्लगार असून एल अँड टी बांधकाम करीत आहे

प्रकल्पाचा खर्च 3 हजार 826 कोटी रुपये

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 212 मीटर उंच पुतळा उभारण्यात येणार आहे

स्मारकाला दैनंदिन 10 हजार प्रवासी भेट देतील असा अंदाज आहे